झुक झुक अगिन गाडी ,
धुरांच्या रेशा हवेत कधी,
पलती जाड़े पाहुया,मामाच्या गावाला जावुया ....
काही काही गान्यांमधे खरच एक ताकत असते ती आपल्याला त्यांच्याबारोबर घेउन जातात,त्या त्या मूड मधे रमरान करतात.हे असाच एक बालगीत.जेव्हा जेव्हा मी हे एकतो तेव्हा tevha ते मला माझ्या बांलपणातिल मामाच्या घरी घालवलेल्या सुट्यांची आठवां करून देत. तसा प्रत्येक्जन लहानपणी सुटंयान्मधे कुठे न कुठेतरी जात असतोच .आता समर कैंप किंवा होब्बी क्लास्सेस झाले असले तरी हयात काहीही बदल झालेला नाही सुट्टी लागायच्या आधीच सुटीमधे कुठे कुठे जयाचे ह्याची स्वप्न रंगवली जायची,पण मांज्यासाठी तरी मामाच्या घरी रहायला जायच म्हणजे मेजवानी असायची.वर्षातुन एकदा मिळनारीसंधी म्हणजे मला आसमान ठेंग वाटायच .अरे हो ! मामाच्या गावाच्या घरची नहीं तर मुम्बैमाधल्या घराची गोष्ट करतोय.मामाच ऑफिस राणीबागेत व घर वरळीला .घर म्हनजे सी फेंसिंग फ्लैट समोरच समुद्राचा विराट दर्शन अगदी २४ तास ..खारे वारे ,सूर्योदय,सूर्यास्त क्षितिजवरच्या बोटी ,लाटा खेळायला घरात व बाहेर भरपूर जागा..आनी काय पाहिजे ?
तर मामाकडे रहायला जायचा कार्यक्रम ८-१० दिवसांचा असायचा व त्याहिमधे नित्यनेमाने केलि जाणारी गोष्ट म्हणजे किमान दोन-तीन दिवस तरी रानिबगेत म्हणजेच मामाच्या ऑफिसमधे जायच .ऑफिसात म्हणजे मामा ऑफिसात अणि मी अणि माझा मामेभाऊ सबंध रानीबागेत हुदडत .तस प्राणी बघायच जास्त वेड नव्हत किंवा लहानपणापासुंन रानीबागेत ये -जा असल्यामुळे नाविन्य राहिल नव्हत .पण नर्सरीत फिर ,गूंजा जमा कर,झाडावर चढ़ ,बाहेरून आईस क्रीम खाऊन ये असे उद्योग चालू असायचे .बरोबर असायच कुणीतरी लक्ष ठेवायला ....कधी कधी मिळतिल ती फूल पिशव्याच्या पिशव्या भरून जमा करायची..काही जमिनीवरची तर काही झाडावरची...कधी कधी मामाकडे मोराच्या पिसांचा हट्ट करायचा व मिळेपर्यंत मागे तगादा लावायचा.लहान वयात हे सगल खुप थ्रिल्लिंग वाटायच.त्यामधे कधी हत्तीला खायला घालायला जायच्या जागेत जायच tar कधी बागेत खेळायच .तासन तास घालवून जमा केलेल्या गूंजा घरी येउन मोजायच्या ....
तिथल्या मुक्कामात एकतरी फेरी दादर चौपाटीला व्हायचीच.त्यावेळची दादर चौपाटी म्हणजे काही औरच होती, आता ज्यानी दादर चौपाटी पहिली आहे त्याना तेथे kachra , गार्डेन ,समोरच फ्लाय ओव्हर दिसेल.पण मला मात्र लांबच लांब किनारा,फेसाळनार्या लाटा त्यामधे मामाचा हात पकडून चिम्ब भिजन ,रुमालामधे शंख शिम्पल्या जमा करन,भेल पूरी खान,किल्ले बनवण,घोडा गाडीमधुंन फिरण,ओलेताच ट्य़ँक्सिमधे जावून बसन हे सगळ सगळ आठवत.साला वो जमाना कुछ और था ! वोह दादर चौपाटी कुछ और थी!त्यावेळेची काहीच खूण तिथे गेल्यावर patat नाही...असो....चालायचच हे सगळ !!!
बऱ्याच नव्या गोष्टी मी मामाकडे अनुभवल्या ,शिकलो त्यापैकी एक म्हणजे सायकलघरामधली तीन चाकी सायकल लहान वाटू लागल्यावर ताशी भाड्याने मिळनार्य़ा सायकल चालावायाच्या ,शर्यती लावायच्या अस sagaLa chalaycha . teva sayakal शिकताना ढोपर फोडून घेतल्यानन्तरही सायकल चालवण्याचा उत्साह ,कौलनीच्या सगळ्या भागात फिरवलेली सायकल ,शर्यती हे सगळ मस्तच....
त्यावेळी मी चाळीत रहात असल्यामुळे क्रिकेट मैदानात जाण तसा कमीच व्हायच.पण वरळीला मात्र मैदानात खेळण्याचा व तासंतास क्रिकेट खेळन्याचा मजा काही औरच होता
एक न अनेक ,किती आठवणी वेचून ठेवल्यासारख्या झाल्यायेत .हातात चप्पल घेउन लपाछपी खेळन,गच्चीवर पतंग उड़वण,क्रिकेट खेळण ,मामीबरोबरर कन्हेरीच्या झाडाखाली बसन,लायब्ररी मधे जावून पुस्तकांची उलथापालथ करण,वरळी सी फेस ला जाण फन फेयरमध्ये मज्जा करन ,मुंबई फिरण....चौपाटीवर साबनाच पाणी विकणारा जसे बुडबुडे उडवत असतो तसच काहीसा झालेय आता माझ॥ फक्त फरक एवढाच की ते बुडबुडे आठवणीचे आहेत ...
प्रत्येकजनाच्या बालपणीच्या रम्य आठवणी असतात त्यापैकी माझ्या आठवानिचा इंटीग्रल पार्ट म्हणजे मामाच घर व मी केलेली मजा....आज मोठा झाल्यावर मामाकडे रहायला जाण शक्य नाही....ती वरळीची जागादेखिल आत्ता नाही ...पण त्या सुखद आठवणी ज्या मी इथे लिहिल्या किंवा लिहिल्याही नाहित त्यानी माझ बालपन नक्कीच सुगन्धित करून टाकलेय .फिरून पुन्हा सगळ काही परत येण शक्य नाही पण evadh मात्र नक्की की आय विल चेरिश दोज मोमेंट्स फॉरएवर..........................प्रशांत