पूर्ण पदम पर्यंत जायचा प्लॅन नव्हता . ड्र्याग ड्रुन्ग ग्लॅशियरचे फोटो बघितल्यापासून कधी एकदा तिकडे जातोय असं झालेलं . सकाळी लवकरच निघालो. परत येऊन छोटासा थांबा घेऊन कारगिल गाठायचं होतं . वेशीवरच रंगदुम मोनेस्टरी लागली.
पायऱ्या चढून वर जायला वेळ असतां ,व तशी कुणाचीच त्यात वेळ घालवायची इच्छा नव्हती. अजून बऱ्याच मोनेस्टरी बघायच्या बाकी होत्या . इकडे वेळ न घालवता सरळ मार्गस्थ व्हायचं असच आम्ही ठरवलं. २०० वर्षे जुनी असलेली हि मोनेस्टरी बाहेरूनच बघुन आम्ही पुढे निघालो.ज्या मार्शलॅन्ड बद्दल ऐकलं होतं व फोटो पहिले होते त्यांची झलक निघतानाच पाहायला मिळाली.
त्सो मोरिरी लेकजवळ देखील असे मार्श लँड बघायला मिळतात . दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती. मॉरमॉट पण उदंड दिसत होते. काल एक बघायला मिळायला पण तास लागला होता पण आज जागोजागी दिसले. पुढे खूप मोठठे पात्र असलेली नदी दिसली. प्रवाह मात्र झाडांची मुळे फुटलेली असतात तसे फाटे फुटून वाहत होते.
छोटे ओढे ,पिवळी निळी रानफुलं ,थंडगार वारे यामुळे वातावरण मस्तच होतं . थंड वाऱ्यामुळे खिडकीची काच उघडी ठेवणं मुश्किल झालं होतं . फोटोसाठी ती उघडली कि सगळी अक्षरशः ओरडायचे विशेषतः मागचे बसलेले .
थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे बोर्ड दिसला Welcome To Zanskar Valley .
त्याच्या आजूबाजूला भरगच्च प्रेयर फ्लॅग्स .म्हणजेच सुरु व्हॅली संपुन आम्ही झंस्कार व्हॅलीत प्रवेश करत होतो . त्या पॉईंट वर फोटो सेशन आटपून पुढे निघालो. जवळ असलेल्या नकाशाप्रमाणे stat tso व lang tso हि दोन लेक लागली पाहिजेत असं म्हणता म्हणता तिथे पोहोचलोही.
तिथे हि तळी बघण्यासाठी वॉच टॉवर आहे. पण मी व अमित जवळून ती लेक्स बघायची,अनुभवायची म्हणून त्या थंडीत दमत का होईना चालत तळयाजवळ जाऊन पोहोचलो. थोडं दमायला झालं पण it was worth it . तिथून वाकड्या वाटेने वॉच टॉवर कडे पोहोचलो जिकडे आधीच सगळा ग्रुप पोहोचला होता. तिथे प्रत्येक खांबाकडे एक एक असे उभे राहून फोटो काढले व पुढे निघालो.
आता लागला पेन्झी - ला पास . हा कारगिल पदंम रस्त्यावरचा सगळ्यात उंच पॉईंट आहे १४००० फुटावर. झंस्कार डेव्हलपमेंट ऑटोरिटी ने (ZDA ) तास बोर्ड पण लावलाय तिकडे.
तिथे काही वेळ थांबून ड्रॅग ड्रुन्ग कडे निघालो, आणि लवकरचं (हे रंगदुम पासून ४० किमी अंतरावर आहे)तिथे पोहोचलो . काराकोरम पर्वतरांगेमधील सियाचेन ग्लॅशियर मागोमाग ह्या ग्लॅशियरचा विस्तार आहे. त्याची लांबीचा साधारण २३एक किमी आहे. व स्टोक नदी इथे उगम पावते. इंग्रजी एस आकाराचा बर्फाचा पट्टा दुरून बघताना अचंबित व्हायला होतं . सगळ्या सफरींमधला इथे येणं व हे भव्यदिव्य अनुभवणं हा नक्कीच अविस्मरणीय क्षण होता.
इथे मंदार ची तब्येत थोडी बिघडली. बहुधा AMS (ऍक्यूट माउंटेन सिकनेस )चा त्रास होत होता .बाकीचे अजूनही बरे होते. सगळ्यांनी मनसोक्त फिरून व फोटो काढून घेतले. जागाच अशी आहे कि इथून पाय काढवत नाही . कितीही वेळ थांबलो तरी थांबुन राहावेसे वाटते. बराच वेळ थांबून आम्ही निघालो. नाष्टा झाला नव्हता. दुपार होत चालली होती. रंगदुम मध्ये जाऊन नाष्टा करायचा व कारगिलसाठी निघायचं असा ठरलं.परतीचा मार्ग पकडून रंगदुम मधल्या हॉटेल मध्ये येऊन आम्ही नाष्ट्याची ऑर्डर दिली.
अजूनपर्यंत कसलाही त्रास ना झालेला मी मात्र इथे जाम झालो. डोकं खूप दुखायला लागलं . पोटात दुखायला लागलं. नाश्ता चहा काहीचजाईना . गुरगुर चहा पण मागवलेली. पण ती खूप खारट वाटली. मला अजिबात आवडली नाही,एकच दूध तर न्हाई गोष्ट होती. थंड वारे बेफाम सुटले होते. बाहेर नुसतं उभं राहू म्हटलं तरी जमत नव्हतं . हिम्मतच होत नव्हती .सगळं आटपून लगेच परतीच्या (कारगिल ) वाटेला लागलो.
कालच सौंदर्य पुन्हा एकदा,राहिलेल्या जागा परत परत थांबून बघत आम्ही निघालो. त्यातील काही निवडक सौंदर्य :
कारगिलच्या जवळपास तरी ४० एक किमी मागे रस्त्याच्या कडेला उभी असलेली लडाखी मुलं दिसली. अतिशय गोड मुलं हात हलवून टाटा करत होती. थोडं थांबून गाडीतूनच त्यांचे फोटो काढले.
संध्याकाळपर्यंत मस्त कारगिलमध्ये पोहोचलो.कालचा जेवणाचा अनुभव(महाग अर्थातच :) ) लक्षात घेऊन मी व मध्ये उतरून जेवण पार्सल घेऊन आलो. तिथेच मार्केटमध्ये गुरगुर चहा ,बदाम व अक्रोड तेलाची खरेदी पण केली.
दुसऱ्या दिवशी कारगिल ते लेह प्रवास करायचा होता. झंस्कारचा ड्राइवर व गाडीचा संबंध संपला होता ,परवाच्या ड्रायव्हरला दुसऱ्या दिवशीच्या प्रवासातही फोन करून आम्ही सांगून ठेवले.
दिवस ५वा - कारगिल - लेह (२३४ किमी )
लडाखमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं कधीच कंटाळवाणं नसतं .हा रस्त्याच्या अवस्थेमुळे त्रासदायक होत असेल पण निसर्ग ती सगळी कसर भरून काढतो. दार नव्या वळणावर आपण डोळे विस्फारून काहीतरी नवीन गोष्ट बघत असतो.,डोळ्यात साठवत असतो . प्रवासाचा त्रास शिणवटा त्यातच निघुन जातो.
सकाळी हॉटेलचा निरोप घेतला. हॉटेल चांगल आहे व स्टाफ देखील. हार्ड बार्गेन करता आलं पाहिजे बस.
सकाळी आम्हाला कळले कि इथून एका किमी वर बॉर्डर आहे. मग आम्ही ड्राइव्हरजवळ हट्टच धरला ती बघायचा. नाईलाजाने तो तयार झाला. डोंगर,त्यावर(न दिसलेली)जवानांची चौकीं ,व दूर डोंगरापलीकडे पाकिस्तान(जो दिसत नाही फक्त डोंगरचं दिसतात)हे सगळं बघितलं .
जवानांना रसद कशी पोहोचवत असतील ,नदीकिनाऱ्यावरून वर चढून जाणे किती कठीण आहे अशी चर्चा करत आम्ही लेहकडे मार्गस्थ झालो.
आजचा पहिला पडाव होता मुलबेक येथील मैत्रेय बुद्धमूर्ती असलेला गोम्पा.थोड्या वेळात तिकडे पोहोचलो .रस्त्याला लागूनच हा गोम्पा आहे. हि दगडात कोरलेली देखणी मूर्ती. इस पूर्व पहिल्या शतकातील आहे असा बोर्ड तिकडे लावलेला आहे. बाहेरच मोठ्ठ प्रेयर व्हील होतं . भिंतीवर मंत्र लिहिलेले आहेत.आतमध्ये टिपिकल बौद्ध मठांमध्ये दिसतं तसं वातावरण होतं .समोर बुद्धांची मुर्ती होती. बाजूला दलाई लामांचे फोटो होते. सुंदर कलाकुसर व बारीक नक्षीकामाने रंगवलेली वाद्ये,कोरीवकाम असलेले लाकूड ,त्याचे बॉक्सेस ,घंटा ,दिवे असं बराच काही होत. सगळं अँटिक ,दिसायला सुरेख. राजेश सोडून आम्ही सगळे इथे पहिल्यांदाच येत होतो, बौद्ध गोम्पा पहिल्यांदाच पाहत होतो.
इथे समोरच हॉटेल्स आहेत एक दोन. तिथे अप्रतिम पराठे खायला मिळाले .अजूनही चव आहे तोंडावर असं वाटत इतके मस्त होते. वातावरणाचा परिणाम पण नक्कीच होता ते आवडण्यामध्ये.
डाळ ,लोणच्याबरोबर पहिल्यांदा चव चाखल्यावर मग रिपीट ची ऑर्डर दिली सगळ्यांनी. मनसोक्त भरपेट खाऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
आकाश निळेभोर दिसत होतं . निळ्या आकाशात पांढऱ्या ढंगांचे पुंजके फारच छान दिसत होते.
आता आलं नमिका ला .प्रत्येक उंचीवर असणाऱ्या पासेसना नावं देण्यात आलेली आहेत. व BRO किंवा प्रोजेक्ट विजयांक च्या ताशा पाट्या लावलेल्या दिसतात व असे पासेस अनुभवत पुढे जाण्यात लडाखच्या प्रवासाची मजा असते. उतरायचं,त्या उंचीचा आनंद घ्यायचा ,सभोवतालच्या निसर्गाचं रूप न्याहाळायचं व मार्गी लागायचं . आम्ही पण १२१९८ फुटांवर असलेल्या ह्या पासवर थांबूनच पुढे निघालो. इथे मोठे लँड्सकॅपेस दिसतात. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा व निळं आकाश... परकेक्ट कॉम्बिनेशन .इथेच मी ह्या ट्रिप वरचा मला आवडलेला फोटो काढून घेतला. म्हणजे अचानक मनात आलं असा फोट चांगला येईल मस्त दिसेल आणि अमितनेही मनासारखा काढला.
ह्या रस्त्यावर पुढे एकही झाड नसलेले रखरखीत डोंगर,त्यांच्या पायथ्याशी हिरवळ व क्वचित शेती असा दृश्य चालू झालं . निळसर आकाश ,वाळूसदृश मातकट चॉकलेटी डोंगर ,हिरवी शेतीं ,पिवळ्या फुलांच्या झालरी ,काळा डांबरी रस्ता अशी नुसती रंगांची सरबराई होती.
पुढे उंची वाढत गेली व फोटू-ला टॉप ( १३४७० फुट ) लागला.श्रीनगर लेह रोडवरचं सगळ्यात उंच ठिकाण . इथे काही लडाखी बायका स्वेटर शिवत बसलेल्या. थोड्या वेळाने इथे १० एक बुलेटस्वार (सगळे परदेशी )गट आला. सगळ्यांच्या बुलेट पण नवीन होत्या .त्यांच्यापैकी पांढरी दाढी असलेला एक फॉरेनर भारी दिसत होता.त्याच्याबरोबर फोटो काढले आम्ही.
१५ कमी पुढे गेल्यावर लागली ती लामायुरू मोनेस्टरी.हि फार जुन्या असलेल्या गोम्पापैकी एक आहे. आतमध्ये खूप सारे रस्ते व खोल्या होत्या. बरेच लामापन होते. काही खूप वृद्ध लामापन होते,काही छोटेखानी प्रेयर व्हील हातात गोल गोल फिरवत बसलेले दिसले.आम्ही काही विचारून त्यांची तंद्री भंग केली नाही. गोम्पात काही चपट्या दगडांवर तिबेटी भाषेत कोरलेले दिसले. काय ते मात्र समजले नाही.
याच गोम्पामध्ये वर्षातून दोन वेळा जेव्हा आजूबाजूचे लामा प्रार्थनेसाठी एकत्र जमतात तेव्हा "मास्क डान्स फेस्टिवल " होतो .तो बघायला फार गर्दी होते. मठाच्या खाली एक निर्मनुष्य छोटेखानी दुकान होते. माळा ,खडे,प्रेयर फ्लॅग्स ,तबक सगळं होतं विकायला.
फक्त एकदा बघून घेतलं व निघालो. इथून निघाल्यावर समोरच आपल्याला broken moonland दिसते. म्हणजेच डोंगराचा हा भाग चांद्रभूमीप्रमाणे दिसतो म्हणून त्याला ब्रोकन मुनलॅन्ड म्हणतात.
लामायुरूला जुन्या सोडून दिलेल्या घरांचे अवशेष लांबून पण छान दिसतात.
इथून पुढे लेहला जाणाऱ्या रस्त्यावर निम्मूचा संगम,गुरुद्वारा पत्थर साहिब,मॅग्नेटिक हिल पॉईंट लागले. लोकल एरिया फिरताना हे सगळं बघायला मिळणारच होतं त्यामुळे आम्ही खाली उतरलो नाही. हा मॅग्नेटिक हिल ला मात्र थांबलोच.
पण तस काहीच अनुभवायला मिळालं नाही जस एवढं बोललं जात.
पुढे लेह शहरात शिरलो. बराच फिरत फिरत मध्येच तसेवांग भेटला .त्याने स्वतः गाडी चालवला घेतली. व आम्हाला एका होमस्टे मध्ये घेऊन गेला. वैभव व मंदार बहुधा आत जागा बघायला गेले. तसपण ओळखीने सांगून ठेवलेलं या ठिकाणी. जागेत काहीच प्रॉब्लेम नव्हता. थोडी लांब होती एवढच.त्यामुळे पुन्हा दुसरीकडे ना बघता इथेच राहायचं असं सर्वानुमते ठरलं. बॅग्स उतरवून आम्ही आम्हाला दिलेल्या दोन खोल्यात पसरलो.:)
आता पुढचे काही दिवस हेच आमचं घर होतं ,बेस होता ,व घरातल्या माणसांनी त्यांच्या आदरातिथ्याने खरंच होमस्टे न राहता घरासारखा फील दिला येणाऱ्या दिवसात आम्हाला.
संध्याकाळी वेळ मिळाला तसा मार्केट मध्ये गेलो. प्रसिद्ध "नेहा स्नॅक्स "ला गेलो. थोडा फेरफटका मारून खाऊन पिऊन उशिरा परत आलो. रात्री लेह मार्केट ,फिरणारे फिरंगी लोकं ,दुकानं बघायला वेगळच वाटतं.
----------------------------------------------------*********--------------------------------------------------
पायऱ्या चढून वर जायला वेळ असतां ,व तशी कुणाचीच त्यात वेळ घालवायची इच्छा नव्हती. अजून बऱ्याच मोनेस्टरी बघायच्या बाकी होत्या . इकडे वेळ न घालवता सरळ मार्गस्थ व्हायचं असच आम्ही ठरवलं. २०० वर्षे जुनी असलेली हि मोनेस्टरी बाहेरूनच बघुन आम्ही पुढे निघालो.ज्या मार्शलॅन्ड बद्दल ऐकलं होतं व फोटो पहिले होते त्यांची झलक निघतानाच पाहायला मिळाली.
| मार्शलॅन्ड |
त्सो मोरिरी लेकजवळ देखील असे मार्श लँड बघायला मिळतात . दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती. मॉरमॉट पण उदंड दिसत होते. काल एक बघायला मिळायला पण तास लागला होता पण आज जागोजागी दिसले. पुढे खूप मोठठे पात्र असलेली नदी दिसली. प्रवाह मात्र झाडांची मुळे फुटलेली असतात तसे फाटे फुटून वाहत होते.
छोटे ओढे ,पिवळी निळी रानफुलं ,थंडगार वारे यामुळे वातावरण मस्तच होतं . थंड वाऱ्यामुळे खिडकीची काच उघडी ठेवणं मुश्किल झालं होतं . फोटोसाठी ती उघडली कि सगळी अक्षरशः ओरडायचे विशेषतः मागचे बसलेले .
थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे बोर्ड दिसला Welcome To Zanskar Valley .
| प्रेयर फ्लॅग्स चा माझ्या आवडलेल्या फोटोंपैकी एक |
| प्रेयर फ्लॅग्सचे फोटो काढताना मी :) pc :राजेश |
| वॉच टॉवर |
![]() |
| वरील तलावांची चित्रे :साभार राजेश |
तिथे हि तळी बघण्यासाठी वॉच टॉवर आहे. पण मी व अमित जवळून ती लेक्स बघायची,अनुभवायची म्हणून त्या थंडीत दमत का होईना चालत तळयाजवळ जाऊन पोहोचलो. थोडं दमायला झालं पण it was worth it . तिथून वाकड्या वाटेने वॉच टॉवर कडे पोहोचलो जिकडे आधीच सगळा ग्रुप पोहोचला होता. तिथे प्रत्येक खांबाकडे एक एक असे उभे राहून फोटो काढले व पुढे निघालो.
![]() |
| only god knows about amits pose |
तिथे काही वेळ थांबून ड्रॅग ड्रुन्ग कडे निघालो, आणि लवकरचं (हे रंगदुम पासून ४० किमी अंतरावर आहे)तिथे पोहोचलो . काराकोरम पर्वतरांगेमधील सियाचेन ग्लॅशियर मागोमाग ह्या ग्लॅशियरचा विस्तार आहे. त्याची लांबीचा साधारण २३एक किमी आहे. व स्टोक नदी इथे उगम पावते. इंग्रजी एस आकाराचा बर्फाचा पट्टा दुरून बघताना अचंबित व्हायला होतं . सगळ्या सफरींमधला इथे येणं व हे भव्यदिव्य अनुभवणं हा नक्कीच अविस्मरणीय क्षण होता.
![]() |
| साभार राजेश |
![]() |
| साभार राजेश |
![]() |
| साभार राजेश |
इथे मंदार ची तब्येत थोडी बिघडली. बहुधा AMS (ऍक्यूट माउंटेन सिकनेस )चा त्रास होत होता .बाकीचे अजूनही बरे होते. सगळ्यांनी मनसोक्त फिरून व फोटो काढून घेतले. जागाच अशी आहे कि इथून पाय काढवत नाही . कितीही वेळ थांबलो तरी थांबुन राहावेसे वाटते. बराच वेळ थांबून आम्ही निघालो. नाष्टा झाला नव्हता. दुपार होत चालली होती. रंगदुम मध्ये जाऊन नाष्टा करायचा व कारगिलसाठी निघायचं असा ठरलं.परतीचा मार्ग पकडून रंगदुम मधल्या हॉटेल मध्ये येऊन आम्ही नाष्ट्याची ऑर्डर दिली.
अजूनपर्यंत कसलाही त्रास ना झालेला मी मात्र इथे जाम झालो. डोकं खूप दुखायला लागलं . पोटात दुखायला लागलं. नाश्ता चहा काहीचजाईना . गुरगुर चहा पण मागवलेली. पण ती खूप खारट वाटली. मला अजिबात आवडली नाही,एकच दूध तर न्हाई गोष्ट होती. थंड वारे बेफाम सुटले होते. बाहेर नुसतं उभं राहू म्हटलं तरी जमत नव्हतं . हिम्मतच होत नव्हती .सगळं आटपून लगेच परतीच्या (कारगिल ) वाटेला लागलो.
कालच सौंदर्य पुन्हा एकदा,राहिलेल्या जागा परत परत थांबून बघत आम्ही निघालो. त्यातील काही निवडक सौंदर्य :
| माझा आवडता अजून एक |
| शिलाजीत |
कारगिलच्या जवळपास तरी ४० एक किमी मागे रस्त्याच्या कडेला उभी असलेली लडाखी मुलं दिसली. अतिशय गोड मुलं हात हलवून टाटा करत होती. थोडं थांबून गाडीतूनच त्यांचे फोटो काढले.
संध्याकाळपर्यंत मस्त कारगिलमध्ये पोहोचलो.कालचा जेवणाचा अनुभव(महाग अर्थातच :) ) लक्षात घेऊन मी व मध्ये उतरून जेवण पार्सल घेऊन आलो. तिथेच मार्केटमध्ये गुरगुर चहा ,बदाम व अक्रोड तेलाची खरेदी पण केली.
दुसऱ्या दिवशी कारगिल ते लेह प्रवास करायचा होता. झंस्कारचा ड्राइवर व गाडीचा संबंध संपला होता ,परवाच्या ड्रायव्हरला दुसऱ्या दिवशीच्या प्रवासातही फोन करून आम्ही सांगून ठेवले.
दिवस ५वा - कारगिल - लेह (२३४ किमी )
लडाखमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं कधीच कंटाळवाणं नसतं .हा रस्त्याच्या अवस्थेमुळे त्रासदायक होत असेल पण निसर्ग ती सगळी कसर भरून काढतो. दार नव्या वळणावर आपण डोळे विस्फारून काहीतरी नवीन गोष्ट बघत असतो.,डोळ्यात साठवत असतो . प्रवासाचा त्रास शिणवटा त्यातच निघुन जातो.
सकाळी हॉटेलचा निरोप घेतला. हॉटेल चांगल आहे व स्टाफ देखील. हार्ड बार्गेन करता आलं पाहिजे बस.
सकाळी आम्हाला कळले कि इथून एका किमी वर बॉर्डर आहे. मग आम्ही ड्राइव्हरजवळ हट्टच धरला ती बघायचा. नाईलाजाने तो तयार झाला. डोंगर,त्यावर(न दिसलेली)जवानांची चौकीं ,व दूर डोंगरापलीकडे पाकिस्तान(जो दिसत नाही फक्त डोंगरचं दिसतात)हे सगळं बघितलं .
| साभार राजेश |
| साभार राजेश |
जवानांना रसद कशी पोहोचवत असतील ,नदीकिनाऱ्यावरून वर चढून जाणे किती कठीण आहे अशी चर्चा करत आम्ही लेहकडे मार्गस्थ झालो.
आजचा पहिला पडाव होता मुलबेक येथील मैत्रेय बुद्धमूर्ती असलेला गोम्पा.थोड्या वेळात तिकडे पोहोचलो .रस्त्याला लागूनच हा गोम्पा आहे. हि दगडात कोरलेली देखणी मूर्ती. इस पूर्व पहिल्या शतकातील आहे असा बोर्ड तिकडे लावलेला आहे. बाहेरच मोठ्ठ प्रेयर व्हील होतं . भिंतीवर मंत्र लिहिलेले आहेत.आतमध्ये टिपिकल बौद्ध मठांमध्ये दिसतं तसं वातावरण होतं .समोर बुद्धांची मुर्ती होती. बाजूला दलाई लामांचे फोटो होते. सुंदर कलाकुसर व बारीक नक्षीकामाने रंगवलेली वाद्ये,कोरीवकाम असलेले लाकूड ,त्याचे बॉक्सेस ,घंटा ,दिवे असं बराच काही होत. सगळं अँटिक ,दिसायला सुरेख. राजेश सोडून आम्ही सगळे इथे पहिल्यांदाच येत होतो, बौद्ध गोम्पा पहिल्यांदाच पाहत होतो.
| रस्त्यावरून दिसणारा गोम्पा - |
इथे समोरच हॉटेल्स आहेत एक दोन. तिथे अप्रतिम पराठे खायला मिळाले .अजूनही चव आहे तोंडावर असं वाटत इतके मस्त होते. वातावरणाचा परिणाम पण नक्कीच होता ते आवडण्यामध्ये.
डाळ ,लोणच्याबरोबर पहिल्यांदा चव चाखल्यावर मग रिपीट ची ऑर्डर दिली सगळ्यांनी. मनसोक्त भरपेट खाऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
आकाश निळेभोर दिसत होतं . निळ्या आकाशात पांढऱ्या ढंगांचे पुंजके फारच छान दिसत होते.
आता आलं नमिका ला .प्रत्येक उंचीवर असणाऱ्या पासेसना नावं देण्यात आलेली आहेत. व BRO किंवा प्रोजेक्ट विजयांक च्या ताशा पाट्या लावलेल्या दिसतात व असे पासेस अनुभवत पुढे जाण्यात लडाखच्या प्रवासाची मजा असते. उतरायचं,त्या उंचीचा आनंद घ्यायचा ,सभोवतालच्या निसर्गाचं रूप न्याहाळायचं व मार्गी लागायचं . आम्ही पण १२१९८ फुटांवर असलेल्या ह्या पासवर थांबूनच पुढे निघालो. इथे मोठे लँड्सकॅपेस दिसतात. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा व निळं आकाश... परकेक्ट कॉम्बिनेशन .इथेच मी ह्या ट्रिप वरचा मला आवडलेला फोटो काढून घेतला. म्हणजे अचानक मनात आलं असा फोट चांगला येईल मस्त दिसेल आणि अमितनेही मनासारखा काढला.
| झोपून प्रेयर फ्लॅग्सचे फोटो काढणारे फॉरेनर्स |
| प्रेयर फ्लॅग्सचे फोटो काढायचं फॅसिनेशन संपत नाही |
ह्या रस्त्यावर पुढे एकही झाड नसलेले रखरखीत डोंगर,त्यांच्या पायथ्याशी हिरवळ व क्वचित शेती असा दृश्य चालू झालं . निळसर आकाश ,वाळूसदृश मातकट चॉकलेटी डोंगर ,हिरवी शेतीं ,पिवळ्या फुलांच्या झालरी ,काळा डांबरी रस्ता अशी नुसती रंगांची सरबराई होती.
पुढे उंची वाढत गेली व फोटू-ला टॉप ( १३४७० फुट ) लागला.श्रीनगर लेह रोडवरचं सगळ्यात उंच ठिकाण . इथे काही लडाखी बायका स्वेटर शिवत बसलेल्या. थोड्या वेळाने इथे १० एक बुलेटस्वार (सगळे परदेशी )गट आला. सगळ्यांच्या बुलेट पण नवीन होत्या .त्यांच्यापैकी पांढरी दाढी असलेला एक फॉरेनर भारी दिसत होता.त्याच्याबरोबर फोटो काढले आम्ही.
| शानसे |
१५ कमी पुढे गेल्यावर लागली ती लामायुरू मोनेस्टरी.हि फार जुन्या असलेल्या गोम्पापैकी एक आहे. आतमध्ये खूप सारे रस्ते व खोल्या होत्या. बरेच लामापन होते. काही खूप वृद्ध लामापन होते,काही छोटेखानी प्रेयर व्हील हातात गोल गोल फिरवत बसलेले दिसले.आम्ही काही विचारून त्यांची तंद्री भंग केली नाही. गोम्पात काही चपट्या दगडांवर तिबेटी भाषेत कोरलेले दिसले. काय ते मात्र समजले नाही.
| लामायारू मोनेस्टरी |
| लामायारू |
| लामायारू गोम्पाला जाणारा रस्ता |
![]() |
| साभार राजेश |
![]() |
| साभार राजेश |
| साभार राजेश |
| साभार राजेश |
| लामायुरू - आतील रस्ते |
| लामायारू -stone carving mantras |
याच गोम्पामध्ये वर्षातून दोन वेळा जेव्हा आजूबाजूचे लामा प्रार्थनेसाठी एकत्र जमतात तेव्हा "मास्क डान्स फेस्टिवल " होतो .तो बघायला फार गर्दी होते. मठाच्या खाली एक निर्मनुष्य छोटेखानी दुकान होते. माळा ,खडे,प्रेयर फ्लॅग्स ,तबक सगळं होतं विकायला.
फक्त एकदा बघून घेतलं व निघालो. इथून निघाल्यावर समोरच आपल्याला broken moonland दिसते. म्हणजेच डोंगराचा हा भाग चांद्रभूमीप्रमाणे दिसतो म्हणून त्याला ब्रोकन मुनलॅन्ड म्हणतात.
लामायुरूला जुन्या सोडून दिलेल्या घरांचे अवशेष लांबून पण छान दिसतात.
इथून पुढे लेहला जाणाऱ्या रस्त्यावर निम्मूचा संगम,गुरुद्वारा पत्थर साहिब,मॅग्नेटिक हिल पॉईंट लागले. लोकल एरिया फिरताना हे सगळं बघायला मिळणारच होतं त्यामुळे आम्ही खाली उतरलो नाही. हा मॅग्नेटिक हिल ला मात्र थांबलोच.
पण तस काहीच अनुभवायला मिळालं नाही जस एवढं बोललं जात.
पुढे लेह शहरात शिरलो. बराच फिरत फिरत मध्येच तसेवांग भेटला .त्याने स्वतः गाडी चालवला घेतली. व आम्हाला एका होमस्टे मध्ये घेऊन गेला. वैभव व मंदार बहुधा आत जागा बघायला गेले. तसपण ओळखीने सांगून ठेवलेलं या ठिकाणी. जागेत काहीच प्रॉब्लेम नव्हता. थोडी लांब होती एवढच.त्यामुळे पुन्हा दुसरीकडे ना बघता इथेच राहायचं असं सर्वानुमते ठरलं. बॅग्स उतरवून आम्ही आम्हाला दिलेल्या दोन खोल्यात पसरलो.:)
आता पुढचे काही दिवस हेच आमचं घर होतं ,बेस होता ,व घरातल्या माणसांनी त्यांच्या आदरातिथ्याने खरंच होमस्टे न राहता घरासारखा फील दिला येणाऱ्या दिवसात आम्हाला.
संध्याकाळी वेळ मिळाला तसा मार्केट मध्ये गेलो. प्रसिद्ध "नेहा स्नॅक्स "ला गेलो. थोडा फेरफटका मारून खाऊन पिऊन उशिरा परत आलो. रात्री लेह मार्केट ,फिरणारे फिरंगी लोकं ,दुकानं बघायला वेगळच वाटतं.
| जुन्या काळी पाण्याचे स्रोत खराब होऊ नये म्हणून त्याशेजारी ठेवण्यात येणारे दगड |
| लेह मार्केटचा रस्ता -तेव्हा रिपेयर चालू होतं |