Friday, February 25, 2011

saath

साथ मित्रांची
जीवाभावाच्या सवंगड्याची
मुसळधार पावसातली ,रखरखनारय़ा उन्हातली ,
संध्याकाळच्या सावलीतली अन टपोर चांद्न्ण्यातली,
शांत सुखातली अन कटू दुखातली,
कॉलेज च्या कट्यावरली अन नाक्यावरच्या ट्परीवरली,
छोट्या रुसव्यामधली अन समजुतिमधली,
एकत्र घालवलेल्या क्षणांमधली,
आंबट गोड आठ्वनीमधली,
दवबिन्दुसारखी तरल,फुलांसारखी कोमल;
आयुष्याच्या पायवाटेवरील मखमल,
साथ मित्रांची........
जीवाभावाच्या सवंगड्याची...........