Thursday, June 23, 2016

लडाख भाग १-तयारी

            काही वर्षांपुर्वी असाच सर्फिंग करत असतांना लडाखचे काही फोटो नजरेत आले नि स्वर्ग पहिल्याचा आभास झाला .इतके सुंदर ठिकाण आपल्या भारतातच आहे हे समजल्यावर तर मग तिथे जायचा ध्यासच लागला . नंतर एक प्रवासवर्णन वाचायला मिळालं ब्लॉग वरच श्रीकांत शिम्पीच (ह्याच वर्षी त्याला शासनाचा फोटोग्राफीचा पुरस्कार मिळालाय). मग अजूनच इच्छा तीव्र झाली . कधी तरी तिथे जायचंच असं वाटू लागलं . ह्या वर्षी ,पुढच्या वर्षी असं चाललेलं . मधल्या वेळात सारखं सारखं नेटवर सर्च कर ,वाचत बस,नकाशे बनव,हॉटेलांची नावं लिही,जागांची नावं लिही ,ठिकाणांची अंतरं काढ असं चाललेलं. कशाचा कशाला पत्ता नाही पण मी मात्र कधीतरी जाईनच ह्या आशेवर फक्त लडाखची चित्र बघुन समाधान मानून घेत होतो. अशातच चार एक वर्ष गेली . नंतर अचानक एक दिवस वैभव(तेलवणे)शी  बोलताना विषय निघाला नि निखार्यावर फुंकर मारल्यासारखी झाली .पार्टनर मिळाल्यावर मग अजुन कुणी येतायत का ते शोधायला सुरुवात केली.साधारण २०१४ ऑगस्ट मधली गोष्ट. मित्रांमध्ये ,whatsapp  ग्रुपवर,नातेवाइकांमध्ये सगळीकडे विचारले राजेश (साळी),अमित बोके ,मंदार व नागसेन असे सहाजण तयार झालो जेवढे  जण  जास्त तेवढा प्रतीमाणसी खर्च कमी असा हिशोब .त्यातल्या त्यात ६ ही संख्या ४ चाकी वाहनातून सामानासकट प्रवासासाठी थोडी त्रासदायकच होती पण चालत होती .
                 खूप दिवस सगळ्या ट्रॅव्हल पोर्टल्सवर शोधून शोधून माहिती काढली ,तिकीटाची किंमत कंपेयर केली . वैभवने ९०DI ही साईट शोधुन काढली कुठूनतरी. सगळ्यात कमी रेट  दाखवतात तिथे असं त्याचं म्हणणं होतं .  फोनाफोनी करून डिसेम्बरमध्येच सुरुवातीला तयार असलेल्या चार जणांची विमानाची तिकिटं काढून टाकली . मस्त चार विंडो सीट बुक केल्या .श्रीनगर ला पोहोचण्याच्या वेळा थोड्याफार फरकाने सारख्याच होत्या . जून जुलै करता करता सर्वानुमते जुलैच ठरला .जास्त बर्फ व पर्यायाने प्रवासात अडचणी नकोत म्हणून जुलैच ठरवला .
                  प्रत्यक्ष जाण्यापूर्वी सगळ्यांची ओळख व्हावी म्हणून मग मुलुंडला आर सिटी मॉल मध्ये भेटलो .नकाशे ,प्लॅन यावर चर्चा झाली .एकंदरीत लडाखचं प्लांनिंग जोरात चालू झालेलं .कपडे,औषधं ,कॅमेरा ,डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स अशी सगळी लिस्ट बनवून ठेवली .जुलै जवळ जवळ यायला लागल्यावर तर मी लडाखच्या स्वप्नातच असायचो ,यथावकाश रिटर्न तिकिटं पण काढली चंदीगड रूटची .कारण अगदी स्पिती व्हॅली करत नसलो तरी श्रीनगर - लेह - मनाली - चंदीगड असं सर्किट पूर्ण करायचं होतं जेणेकरून दोन्ही मार्ग बघून होतील ,बाकी काही राहणार नाही (ते नशिबात नव्हतं खर म्हणजे ... येईल पुढे वाचनात ).आता तेथे फिरण्यासाठी गाडीची व्यवस्था करायची होती .आजच्या घडीला काहीही माहिती करून घ्यायची असेल तर गुगल आपल्या सेवेला हजार असतेच .प्रवास आखणे खूप सोप्प करून टाकलय नेटने . दोन महत्वाच्या साईट्स ज्या बघून व वाचुन मी मागली तीन वर्षं माहिती मिळवली त्या म्हणजे bcmtouring.com  आणि devilonwheels.com . ह्या दोन्ही साईट्सवर लडाख प्रवासासाठी लागणारी इत्यंभूत माहिती आहे . तिथून ड्रायव्हर्स चे मोबाईल नंबर्स मिळवून आम्ही रेट्स काढायला सुरुवात केली .बार्गेनिंग मास्टर वैभव सगळ्यांशी बोलून इकॉनॉमिकल पॅकेज ठरवायचा प्रयत्न करत होता .मीदेखील एक दोघांना फोन करून बघितला.    मग रेट्स कंपेयर करायला सुरुवात केली .वेगवेगळे कोट्स मिळत होते .लडाखमधील प्रवास हा शहरी प्रवासासारखा नाही . कठीण रस्ते ,वातावरण इ मुळे प्रवासाचे रेट्स खूपच जास्त आहेत व गेल्या काही वर्षात त्यांच्यात बरीच वाढ पण झालेली आहे.
   

इमेज सौजन्य : डेव्हील ऑन  व्हील्स साईट (http://devilonwheels.com/leh-ladakh-taxi-rates-2015-16/)




                                    वैभवच्या ओळखीने लेहमध्ये एक कॉन्टॅक्ट मिळालं . त्याच्याकडे २-३ गाड्या होत्या स्वतःच गेस्ट हाऊस होतं (पण बऱ्यापैकी लांब होतं ) . तो चांगल डील देत होता .आणि  काही प्रॉब्लेम झाला तर ओळखीचा फायदा होईल हा विचार करून आम्ही त्सेवान्गलाच फायनल केलं .राहायची सोय तिथे गेल्यावरच बघु असं ठरवलं . कारण आधी बुक करून ठेवलं तर थोडं महागच पडतं समोरासमोर बार्गेन करू शकतो आपण. अगदीच जिथे सुविधा नाही तिथे उदा. कारगिल पॅंगॉन्ग सारख्या ठिकाणी बुक केलं तर ठीक आहे ..जेवायचं वगैरे तिकडेच. अशा प्रकारे सगळी पूर्वतयारी तर मस्त झाली अब तो बस   D -DAY  का  इंतजार था
 
         
मी तयार केलेले मॅप्स 




टीझर्स :





ता क: पहिलाच भाग असल्यामुळे मर्यादित लिहिलंय ,काही नकाशे  सापडत नव्हते ,काही हरवले  असो. पुढील भागापासून सुरु होईल  खरी  प्रवासयात्रा .स्टे ट्युनड
















2 comments:

AVI said...

Waiting for part 2

LadakhPackages.in said...

Planning a trip? Book with us! Get wide range of customised tour packages such as Leh Ladakh tour packages, Ladakh Trekking, Monasteries in Ladakh, Ladakh cultural tour and much more with unforgettable experience. Make your travel enjoyable, spend your vacation with Bonafide Holidays. Book your trip at ladakhpackages.in ladakh-tour-packages/