सकाळी लवकरच विमान होतं .मी रात्रीच ओळखीने मेरू सांगून ठेवलेली .सकाळी सगळं बोजा बिस्तरा घेऊन मेरू घेऊन वैभवला वर्तक नगरला घेरी जाऊन पिकअप केलं आणि विमानतळावर पोहोचलो. मंदार आधीच येऊन बसलेला. अमित व राजेश लवकर आलेले कारण अमितचं विमान लवकरचं होतं .सुका मेवा ठरल्याप्रमाणे सगळं मंदारने आणला होता त्याची सगळ्यांच्या बॅगमध्ये वाटणी केली .नंतर तिकिटं घेतली व सामान चेक इन झालं . एयर इंडिया चं विमान मोठं होतं कॅपॅसिटी जास्त वाटली . सीटवर समोरच स्क्रीन होती त्यात काही चॅनेल्स लागत व विमानाचा मार्ग ,विमानाची आताची जागा ,अंतर,उंची,हवामान असे सगळे तपशील त्यात दिसत होते . विमान वेळेवर निघालं . सगळ्यांच्या विंडो सीट्स असल्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकत नव्हतो पण वैभव व मी मागे पुढे होतो . बाहेर लवकरच ढग दिसू लागले व विमान पूर्ण वेळ ढंगातच राहू लागले . आमचा दिल्लीला हौल्ट होता पण विमान मात्र तेच होतं त्यामुळे आम्ही जागेवरच बसून होतो बाहेर बरच सामान चढवलं गेलं उतरवलं गेलं (लोडींग अनलोडींग )काही नवीन प्रवासी आले . दिल्लीवरून पुढे मात्र श्रीनगर मार्गावर अप्रतिम असे डोंगरांचे व ढगांच्या पुंजक्यांचे दर्शन झाले.डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा , वेगळ्या विलक्षण आकाराचे ,दाट , ढंगांचे पुंजके वर्णनातीत होते. लवकरच आम्ही श्रीनगर विमानतळावर पोहोचलो. मस्त वातावरण होते. थोडासा पाऊस पडून गेलेला .हवेत मस्त गारवा होता .सगळीकडे माणसांची बाहेर पाडण्यासाठी लगबग चाललेली . सामान घेऊन बाहेर पडल्यावर टॅक्सी,गाडीची चौकशी केली .शेवटी दोघं तिघांना विचारून ,स्टँडवरून पावती फाडून सरळ टॅक्सी बुक करून टाकली दल लेकपर्यंत सोडण्यासाठी .कारण एकदा लेकपर्यंत पोहोचलं कि पुढचं बघता येईल हा विचार होता .
दल लेक हेच ठिकाण पहिल्या दिवसाच्या स्टे साठी ठरवलं होतं . शिकार्यात रहायचं जमल्यास व साईटसीइंग करायची असा प्लॅन ठरलेला,कारण दल सरोवर खूप मोठं आहे. त्या सरोवराचे सर्व ऋतू मधील फोटो पाहून ते ठिकाण खूप सुंदर असेल असे मनात चित्र उभे राहते .टॅक्सी वाल्याने लेकवर boulevard roadरोडवर मधल्या गेटपाशी आम्हाला सोडलं . हाउसबोट हे प्रमुख आकर्षण असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा तिची चौकशी केली. छोट्या शिकार्यात बसून एक दोन हाउसबोट बघून पण आलो. पण त्या बऱ्याच आत होत्या . काही गरज लागली,फिरायचं म्हटलं तर त्याच्या किनाऱ्यावर घेऊन येणाऱ्या शिकार्यावर अवलंबुन राहावं लागलं असतं . व समोर असणाऱ्या हाउसबोट फारच महाग सांगत होते. आमच्या बजेट ट्रिप मध्ये आम्हाला न परवडणाऱ्या दरात . त्यामुळे आम्ही सर्वानुमते हाउसबोट मध्ये न राहता हॉटेल मध्ये राहायचं असं ठरवून शोधाशोध सुरु केली . बऱ्याच प्रयत्नांनंतर १७०० रु ला एक हॉटेल मिळालं .अगदीच साधं पण आम्हाला चालणारं .आमच्या ब्रिदवाक्याला साजेसं "सबसे सस्ता और सबसे अच्छा "☺. ५ वाजत आले तरी आम्ही जेवलो नव्हतो. सामान रूमवर टाकून पोटपूजा करून घेतली. नंतर जवळच असलेलं मार्केट व लेक परिसर भटकलो .पहिल्यांदा शिकारा राईड घेतली. शिकारा राईड म्हटलं तर मस्ट पण लेक बघायची भूक मात्र भागत नाही . खरे तर दल लेक खूप मोठे आहे .किनारा जवळपास १५ एक किलोमीटरचा आहे . रुंदी साडे तीन किलोमीटरची. हिवाळ्यात उणे तापमानात हे सरोवर गोठते .ह्या सरोवराची सुरुवात किंवा जिथे टॅक्सिवाले उतरवतात तो भाग जाम गजबजलेला आहे,व बहुतेक साऱ्या पहिलटकर पर्यटकांना तेच आणि तेवढेच लेक आहे असे वाटते .पण खरे भव्य लेक बघायचं तर सरळ पुढे जावं लागतं . ते नक्कीच बघण्यासारखं आहे. शांत ,गजबजाटापासून दूर ,विस्तीर्ण जलाशय असं लेक बघायचं तर पुढे जायला नक्कीच हरकत नसावी. आम्ही मात्र पहिल्या दिवशी हे माहित नसल्यामुळे सुरुवातीच्या गेटवरूनच एक शिकारवाला केला . जरी उजेड होता तरी लवकरच सूर्य मावळतीला जायची वेळ झालेली . त्याने शिकार फिरवायला सुरुवात केली. अन्य हाऊस बोटींच्या आजू बाजूने फिरवत ,पाणथळ जागा बघत आम्ही थोडे पुढे आलो जिथे लेक मोठं होत होतं .पण आम्ही ठरवलेल्या वेळेत व किमतीत अजून पुढे जात येणार नाही असं शिकारावाला म्हणाला. जास्त हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता. पण एकंदरीत सूर्य मावळताना शिकाऱ्यात बसून सरोवरात फिरणे खरंच आनंददायी आहे. चमकणारे पाणी,वेगवेगळ्या आकाराच्या,रुबाबाच्या हाऊसबोट्स ,पाण्यातील वेली ,शिकार्यातील काश्मिरी स्थानिक लोकं हे सगळं बघणं एक वेगळा अनुभव असतो.
रात्री हाऊसबोट्स वर दिवे लागले कि ते दृश्य एकदम मस्तच दिसतं . आमचा शिकारावाला म्हातारा अवलिया होता. कुठलीशी हिंदी चित्रपटांतील गाणीं वाईट आवाजात गात होता . एकंदरीत बिलंदरच होता . तिथे शिकारवाले वेगवेगळे रेट्स लावतात तुम्हाला फिरायचं असेल त्याप्रमाणे .सर्व आटपून आम्ही परत boulevard रोडवर आलो.
नॉन व्हेज खायला जवळपास एकच मोठे हॉटेल होते पण खूप महाग होते . मग शोधता शोधता मार्केट मध्ये आडमार्गाला एक हॉटेल सापडलं. तंदुरीचे प्रकार व तंदूर फिश मिळत होते त्याच्याकडे.,किलो च्या भावाने. मग कुठलातरी मासा त्याने खूप छान असतो सांगितलं म्हणून पाव किलो घेतला. चव छान होती.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते मासे एक्स्पोर्ट केले जातात सगळीकडे . मटण तंदूरी पण घेतली पण चव फारच खराब होती. परत मनात शंका खरंच मटण आहे का अजून काही :) इतर काही ठिकाण जशी निशांत बाग वगैरे फिरणं जमलंच नाही . वेळेअभावी .
दुसऱ्या दिवशी आम्ही कारगिलसाठी निघणार होतो. द्रास मध्ये राहायची तितकीशी चांगली सोय उपलब्ध नाही व कारगिल वरून झंस्कार व्हॅली चा प्रवास सुरु करणं बरं पडलं असतं म्हणून कारगिललाच काहीतरी स्टे ऑप्शन शोधायचा असा ठरवलं. विचारपूस करून मुस्तफा नावाचा एक ड्राइव्हर ठरवला . तो दुसऱ्या दिवशी आम्हाला घ्यायला येणार होता व कारगील पर्यंत सोडणार होता . झंस्कार साठी वेगळी युनिअन आहे त्यामुळे वेगळी गाडी व ड्राइवर लागतो. त्यामुळे ते सगळं कारगिलला जाऊनच बघावं लागणार होतं . संध्याकाळी बरच फिरून झाल्यावर मग आम्ही हॉटेलवर आलो .पहिला दिवस तर मनासारखा पार पडलेला त्यामुळे सगळे खुशीत होतो .

| लेक मधून फिरताना समोर दिसणाऱ्या हाऊस बोट्स |
| शिकारावाला |
| रात्रीच्या काळोखात दिसणारे शिकारे व त्यांची प्रतिबिंबं . |

No comments:
Post a Comment