सकाळी लवकर उठून आम्ही तयारी केली व ड्रायव्हरची वाट पाहत बसलो. मुस्तफा ने लेक जवळ येऊन फोन केला कि तो आलाय. बॅगा सांभाळत इनोव्हा मध्ये ठेवून आम्ही सेटल झालो. आजचा दिवस तास काही प्लॅन नव्हता . श्रीनगर लेह महामार्गावर कारगिल हा पडाव आहे .तिथेच बऱ्यापैकी हॉटेल्स आहेत .द्रास त्यामानाने जास्त उंचीवर ,हॉटेल्स कमी .त्यामुळे कारगिलमध्येच राहायचे असे ठरवले . दुपारपर्यंत पोहोचून संध्याकाळी कारगिल मार्केट व आजूबाजूचा परिसर फिरायचा प्लॅन गाडीतच ठरवला.
थोड्या अंतरावर मस्त नदीकिनारी हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. साधारण अंतर २०० किमी असल्यामुळे तशी कसलीच घाई नव्हती .
वाहणारी नदी ,नदीकिनारी जमलेले पक्षी असं बघता बघता पराठे आले. वेळ जाऊ नये म्हणून ते पार्सल घेतले ,चहा तर प्यायलोच होतो . तसेच निघालो. बाजूच्या नाल्यामधून पण आरशासारखे स्वच्छ पाणी वाहत होते. वातावरण थोडं ढगाळ पण आल्हाददायक होतं .
श्रीनगर सोडल्यावर गंदेरबाल ,गुंड ह्या गावांनंतर सोनमर्ग साधारण ८० किमी वर आहे. काश्मीर फिरायला येणाऱ्यांसाठी हे टुरिस्ट डेस्टिनेशन . फार सुंदर डोंगर(आम्ही गेलो तेव्हा बर्फ फार कमी होता ),सुरुची झाडे ,धरतीपर अगर काही स्वर्ग है ,तो यही है-- यही है याची प्रचिती देणारा निसर्ग ,टुमदार घरं ,हॉटेल्स . खूपच सुंदर निसर्गरम्य ठिकाण . पुढे गेल्यावर एका ठिकाणी डावीकडे एक पार्क लागतं . वरून येणारा छोटासा धबधबा ,छान छान फुलं ,,थोडंसं एडव्हेंचर स्पोर्ट्स (बोटिंग, झोरबिंग वगैरे) . तिथे थोडी फोटोग्राफी केली .
वातावरणात खूपच गारवा जाणवायला लागला होता . अर्धा एक तास तिथे घालवून पुढे निघालो. पुढे पोलिसांनी अडवलं . झंस्कार करायला वेगळी टॅक्सी व ड्राइवर करावा लागतो ,तेथील लोकल्स ना काम मिळावं म्हणून असं करण्यात आलय. पण काही ड्राइवर श्रीनगरवरून येऊन झंस्कार करतात .कधीकधी यात मोठे वादही होतात ..आमचा ड्राइवर आम्हाला कारगील पर्यंतच सोडणार होता . पुढे जाणार नाही हे त्या पोलिसांना समजावून सांगायला त्याला बराच वेळ लागला नंतर कुठे आमची सुटका झाली .पोलीस समजावून घायला तयार नव्हता व दमदाटी चा सूर लावल्यामुळे बराच वेळ लागला.
पुढे बालताल येथे अमरनाथ यात्रेकरिता फाटा फुटतो. जुलै ऑगस्ट मध्ये अमरनाथ यात्रा पूर्ण जोरावर असते .ऑगस्ट च्या अखेरीस ती संपते . त्यानंतर हा रस्ता बराच सुसह्य होतो. तसं पावसामुळे लँड स्लाईड व त्यामुळे रस्ता बंद हे नित्यतेच असते. मे मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करतात .पण सुरुवातीला बर्फ ,व इतर गोष्टीमुळे ह्यावरून प्रवास करणे म्हणजे कठीणच असते ,जसजसा वेळ जातो तास BRO (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) च्या सौजन्याने (खरं म्हणजे कष्टाने) रस्त्याची अवस्था सुधारत जाते. वरून जाताना खाली यात्रेकरूंचे तंबु ,राहायच्या व्यवस्था दिसल्या . शेकडो रंगीबिरंगी टेन्ट्स बघणं मजेशीर अनुभव होता .वेगळाच दृश्य वाटत होतं . यात्रेकरूंना ने आण करणारी हॅलीकॉप्टर्स फेऱ्या मारताना दिसत होती.
बालताल क्रॉस केलं कि येतो तो झोझीला पास . (११६४९ फूट).
ला चा अर्थ हिमालयीन भाषेत पास असा होतो .झोझीला हा लडाख व काश्मीर मधील महत्वांचा दुवा मानला जातो . पावसाळ्यात विशेष करून पाऊस पडून गेला असेल तर मग ह्या पासमधून जाणं एक महाकठीण कर्म होऊन बसतं . १९४७ च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानने काही काळासाठी हा पास हस्तगत केला होता पण आपल्या सैन्याने लवकरच टॅन्क्सचा वापर करून तो परत मिळवला. चिखलाच्या रस्त्यावरून (रस्ता म्हणणं जरा धाडसाचेच ठरेल) आम्ही झोझीला पार केला . मध्येच जागा बघून फोटो काढण्यासाठी उतरलो देखील.
दिवस असल्यामुळे काही वाटत नव्हतं . थंडी बऱयापैकी होती. डोंगरावरून कोसळुन कधीतरी खाली पडलेल्या ट्रक चे अवशेष दिसले नि जाणवलं इथे ड्रायव्हिन्ग करणं सोपं नक्कीच नाही.
त्यातच लष्करासाठी लागणाऱ्या साहित्याची ने आण करणारे ट्रक्स ,इंधनाचे ट्रक्स ह्यामुळे येथे परिस्तिथी अजूनच बिकट होते .
पुढे गेल्यावर गुमरि येथे झोझीला वॉर मेमोरियल आहे. १९४७ साली झालेल्या युद्धात झोझीला पास परत घेताना वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणींमध्ये हे २००९ साली बांधण्यात आलय . जास्त मोठं नाहीये. नेटकं . थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर समोर शहिदांची आठवण सांगणाऱ्या शीला आहेत व ५ तिरंगे डौलाने फडकताना दिसतात .
तिथे ह्या सगळ्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो . मग आले द्रास. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वस्ती असलेले थंड ठिकाण .(The second coldest inhabited place in the world).काही वर्षांपूर्वी उणे ५५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद इथे झालीये.
जम्मू आणि काश्मीरच्या ह्या फेमस बोर्डसमोर थांबून आम्ही फोटो काढले. हा बोर्ड फारसा लक्षात येत नाही.
गाव तस ठीकठाक आहे व मार्केटपण जास्त मोठं नाहीये. त्यानंतर लागलं कारगिल वॉर मेमोरियल. तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी भारतीय सेनेने हे बांधलय. ह्याला द्रास वॉर मेमोरियल पण म्हणतात . प्रवेशद्वाराजवळच बोर्ड होता - NO MISSION TOO DIFFICULT ,NO SACRIFICE TOO GREAT .
ऑपरेशन विजय चा स्तंभ होता. इथे १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांची नाव असलेली एक भिंत आहे .शाहिद जवानांची नावं त्यांच्या डिव्हिजनसकट ह्यावर कोरलेली आहेत व वर लिहिलंय 'BENEATH THIS EARTH,YOUNG WARRIORS SLEEP'.
कारगिलच्या युद्धात ह्यासमोरील पहाडांवर अतिरेक्यांनी बस्तान मांडलेलं .अनेक वीरश्रीनंतर व आहुत्यांनंतर आपण शत्रूला धूळ चारली.
" शहिदो कि चिताओ पर,
लगेंगे हर बरस मेले ,
वतन पर मर मिटणे वालो का ,
यही बाकी निशॉ होगा "
हि वाक्य वाचताना मन बेचैन होतं व डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही .
इथून तोलोलिंग ,टायगर हिल दिसतात. इथे बाजूलाच वीरमरण आलेल्या जवानांच्या शिला आहेत. फोटो काढणं नाही बर वाटलं, मनात वेगळीच भावना येते इथे उभ राहिलं कि! रक्त खवळून उठते मरण पावलेल्या सैनिकांची नाव,शिला बघितल्यावर.
तिथून पुढे मार्गस्थ झालो.रस्ता खूपच चांगला होता. द्रासनंतर ५५ किमी नंतर कारगिल आलं . लेहनंतरच दुसरं मोठं शहर . शहरात शिरताना सुरु नदीनं (इंदु नदी ) आमचं स्वागत केलं .
मुख्य बाजारात हॉटेलचे भाव काहीतरीच महाग आहेत . मग आमचा ड्राइव्हर आम्हाला मेंन बाजारापासून थोडा लांब (जवळजवळ ४-५ किमी वर ) हॉटेल इंटनॅशनल रेसिडेन्सी इथे घेऊन आला. हॉटेल लांब असलं तरी प्रशस्त आणि आरामशीर होतं . प्रश्न एवढाच होता कि मुख्य बाजारपेठ व इतर सुविधा ४-५ किमी लांब होत्या व आमच्याकडे हाताशी वाहन नव्हत.
हॉटेल शोधायच्या आधी आम्ही कारगिल च्या शासकीय रुग्णालयात गेलो. राजेशला स्किन रॅशेसचा त्रास व्हायला लागलेला. त्यासाठी इंजेक्शन व गोळ्या घेऊन आलो. हॉटेलवर आल्यावरही त्याचा त्रास काही कमी होईना !!मला बर वाटलं नाही तर मी पुढे येणार नाही व इथेच थांबेन असं त्याने सांगितल्यामुळे साऱ्यांना अजूनच टेन्शन आल होतं . पुन्हा मग मी अमित व राजेश चालत निघालो. पुन्हा डॉक्टरना भेटून औषधं घेतली व परत हॉटेलवर आलो. तो पर्यंत रात्रीचे ८ वाजलेले . दुसऱ्या दिवशी रंगदुम साठी निघायचं होतं . पदम ,रंगदुम म्हणजे सुरु व झंस्कार व्हॅली पूर्ण करायची म्हणजे तीन दिवस तरी हवेत .पण सगळ्यांच्या इचछे नुसार व वेळ नियोजनासाठी आम्ही झंस्कार व्हॅलीमधील ड्र्याग ड्रुन्ग ग्लॅशियार करून परत येणार होतो ,एक दिवस रंगदुम ला थांबून!
झंस्कार साठी असलेल्या टॅक्सी युनिअन च्या ऑफिसात जाऊन संध्याकाळीच आम्ही झायलो गाडी बुक करून आलेलो. प्रवासातलं पाहिलं रोमांचक ठिकाण उद्या असणार होतं . उद्याची वाट बघवत नव्हती. प्रवासाचा थकवा एवढा काही जाणवत नव्हता. संध्याकाळी काश्मिरी चहा कावा प्यायलो. मस्त लागली.
राजेशला बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत निद्रेच्या अधीन झालो.
-------------------------------------------------------****-------------------------------------------------------------
वाहणारी नदी ,नदीकिनारी जमलेले पक्षी असं बघता बघता पराठे आले. वेळ जाऊ नये म्हणून ते पार्सल घेतले ,चहा तर प्यायलोच होतो . तसेच निघालो. बाजूच्या नाल्यामधून पण आरशासारखे स्वच्छ पाणी वाहत होते. वातावरण थोडं ढगाळ पण आल्हाददायक होतं .
श्रीनगर सोडल्यावर गंदेरबाल ,गुंड ह्या गावांनंतर सोनमर्ग साधारण ८० किमी वर आहे. काश्मीर फिरायला येणाऱ्यांसाठी हे टुरिस्ट डेस्टिनेशन . फार सुंदर डोंगर(आम्ही गेलो तेव्हा बर्फ फार कमी होता ),सुरुची झाडे ,धरतीपर अगर काही स्वर्ग है ,तो यही है-- यही है याची प्रचिती देणारा निसर्ग ,टुमदार घरं ,हॉटेल्स . खूपच सुंदर निसर्गरम्य ठिकाण . पुढे गेल्यावर एका ठिकाणी डावीकडे एक पार्क लागतं . वरून येणारा छोटासा धबधबा ,छान छान फुलं ,,थोडंसं एडव्हेंचर स्पोर्ट्स (बोटिंग, झोरबिंग वगैरे) . तिथे थोडी फोटोग्राफी केली .
![]() |
| PC :राजेश साळी |
![]() |
| PC :राजेश साळी |
वातावरणात खूपच गारवा जाणवायला लागला होता . अर्धा एक तास तिथे घालवून पुढे निघालो. पुढे पोलिसांनी अडवलं . झंस्कार करायला वेगळी टॅक्सी व ड्राइवर करावा लागतो ,तेथील लोकल्स ना काम मिळावं म्हणून असं करण्यात आलय. पण काही ड्राइवर श्रीनगरवरून येऊन झंस्कार करतात .कधीकधी यात मोठे वादही होतात ..आमचा ड्राइवर आम्हाला कारगील पर्यंतच सोडणार होता . पुढे जाणार नाही हे त्या पोलिसांना समजावून सांगायला त्याला बराच वेळ लागला नंतर कुठे आमची सुटका झाली .पोलीस समजावून घायला तयार नव्हता व दमदाटी चा सूर लावल्यामुळे बराच वेळ लागला.
पुढे बालताल येथे अमरनाथ यात्रेकरिता फाटा फुटतो. जुलै ऑगस्ट मध्ये अमरनाथ यात्रा पूर्ण जोरावर असते .ऑगस्ट च्या अखेरीस ती संपते . त्यानंतर हा रस्ता बराच सुसह्य होतो. तसं पावसामुळे लँड स्लाईड व त्यामुळे रस्ता बंद हे नित्यतेच असते. मे मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करतात .पण सुरुवातीला बर्फ ,व इतर गोष्टीमुळे ह्यावरून प्रवास करणे म्हणजे कठीणच असते ,जसजसा वेळ जातो तास BRO (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) च्या सौजन्याने (खरं म्हणजे कष्टाने) रस्त्याची अवस्था सुधारत जाते. वरून जाताना खाली यात्रेकरूंचे तंबु ,राहायच्या व्यवस्था दिसल्या . शेकडो रंगीबिरंगी टेन्ट्स बघणं मजेशीर अनुभव होता .वेगळाच दृश्य वाटत होतं . यात्रेकरूंना ने आण करणारी हॅलीकॉप्टर्स फेऱ्या मारताना दिसत होती.
![]() |
| अमरनाथ यात्रेकरूंचे टेन्ट्स PC :राजेश |
बालताल क्रॉस केलं कि येतो तो झोझीला पास . (११६४९ फूट).
ला चा अर्थ हिमालयीन भाषेत पास असा होतो .झोझीला हा लडाख व काश्मीर मधील महत्वांचा दुवा मानला जातो . पावसाळ्यात विशेष करून पाऊस पडून गेला असेल तर मग ह्या पासमधून जाणं एक महाकठीण कर्म होऊन बसतं . १९४७ च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानने काही काळासाठी हा पास हस्तगत केला होता पण आपल्या सैन्याने लवकरच टॅन्क्सचा वापर करून तो परत मिळवला. चिखलाच्या रस्त्यावरून (रस्ता म्हणणं जरा धाडसाचेच ठरेल) आम्ही झोझीला पार केला . मध्येच जागा बघून फोटो काढण्यासाठी उतरलो देखील.
| झोझीला पास |
| PC :राजेश |
| pc राजेश |
| PC :राजेश |
| PC :राजेश |
दिवस असल्यामुळे काही वाटत नव्हतं . थंडी बऱयापैकी होती. डोंगरावरून कोसळुन कधीतरी खाली पडलेल्या ट्रक चे अवशेष दिसले नि जाणवलं इथे ड्रायव्हिन्ग करणं सोपं नक्कीच नाही.
| ऍक्सिडंट झालेल्या ट्रकचे अवशेष |
त्यातच लष्करासाठी लागणाऱ्या साहित्याची ने आण करणारे ट्रक्स ,इंधनाचे ट्रक्स ह्यामुळे येथे परिस्तिथी अजूनच बिकट होते .
पुढे गेल्यावर गुमरि येथे झोझीला वॉर मेमोरियल आहे. १९४७ साली झालेल्या युद्धात झोझीला पास परत घेताना वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणींमध्ये हे २००९ साली बांधण्यात आलय . जास्त मोठं नाहीये. नेटकं . थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर समोर शहिदांची आठवण सांगणाऱ्या शीला आहेत व ५ तिरंगे डौलाने फडकताना दिसतात .
![]() |
| झोझीला pc :राजेश |
तिथे ह्या सगळ्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो . मग आले द्रास. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वस्ती असलेले थंड ठिकाण .(The second coldest inhabited place in the world).काही वर्षांपूर्वी उणे ५५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद इथे झालीये.
जम्मू आणि काश्मीरच्या ह्या फेमस बोर्डसमोर थांबून आम्ही फोटो काढले. हा बोर्ड फारसा लक्षात येत नाही.
गाव तस ठीकठाक आहे व मार्केटपण जास्त मोठं नाहीये. त्यानंतर लागलं कारगिल वॉर मेमोरियल. तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी भारतीय सेनेने हे बांधलय. ह्याला द्रास वॉर मेमोरियल पण म्हणतात . प्रवेशद्वाराजवळच बोर्ड होता - NO MISSION TOO DIFFICULT ,NO SACRIFICE TOO GREAT .
![]() |
| उजवीकडे झाडांच्या मागे वीर जवानांच्या शीला -ख्रिश्चन सिमिट्री सारख्या |
![]() |
| वैभव |
कारगिलच्या युद्धात ह्यासमोरील पहाडांवर अतिरेक्यांनी बस्तान मांडलेलं .अनेक वीरश्रीनंतर व आहुत्यांनंतर आपण शत्रूला धूळ चारली.
" शहिदो कि चिताओ पर,
वतन पर मर मिटणे वालो का ,
यही बाकी निशॉ होगा "
हि वाक्य वाचताना मन बेचैन होतं व डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही .
इथून तोलोलिंग ,टायगर हिल दिसतात. इथे बाजूलाच वीरमरण आलेल्या जवानांच्या शिला आहेत. फोटो काढणं नाही बर वाटलं, मनात वेगळीच भावना येते इथे उभ राहिलं कि! रक्त खवळून उठते मरण पावलेल्या सैनिकांची नाव,शिला बघितल्यावर.
तिथून पुढे मार्गस्थ झालो.रस्ता खूपच चांगला होता. द्रासनंतर ५५ किमी नंतर कारगिल आलं . लेहनंतरच दुसरं मोठं शहर . शहरात शिरताना सुरु नदीनं (इंदु नदी ) आमचं स्वागत केलं .
मुख्य बाजारात हॉटेलचे भाव काहीतरीच महाग आहेत . मग आमचा ड्राइव्हर आम्हाला मेंन बाजारापासून थोडा लांब (जवळजवळ ४-५ किमी वर ) हॉटेल इंटनॅशनल रेसिडेन्सी इथे घेऊन आला. हॉटेल लांब असलं तरी प्रशस्त आणि आरामशीर होतं . प्रश्न एवढाच होता कि मुख्य बाजारपेठ व इतर सुविधा ४-५ किमी लांब होत्या व आमच्याकडे हाताशी वाहन नव्हत.
हॉटेल शोधायच्या आधी आम्ही कारगिल च्या शासकीय रुग्णालयात गेलो. राजेशला स्किन रॅशेसचा त्रास व्हायला लागलेला. त्यासाठी इंजेक्शन व गोळ्या घेऊन आलो. हॉटेलवर आल्यावरही त्याचा त्रास काही कमी होईना !!मला बर वाटलं नाही तर मी पुढे येणार नाही व इथेच थांबेन असं त्याने सांगितल्यामुळे साऱ्यांना अजूनच टेन्शन आल होतं . पुन्हा मग मी अमित व राजेश चालत निघालो. पुन्हा डॉक्टरना भेटून औषधं घेतली व परत हॉटेलवर आलो. तो पर्यंत रात्रीचे ८ वाजलेले . दुसऱ्या दिवशी रंगदुम साठी निघायचं होतं . पदम ,रंगदुम म्हणजे सुरु व झंस्कार व्हॅली पूर्ण करायची म्हणजे तीन दिवस तरी हवेत .पण सगळ्यांच्या इचछे नुसार व वेळ नियोजनासाठी आम्ही झंस्कार व्हॅलीमधील ड्र्याग ड्रुन्ग ग्लॅशियार करून परत येणार होतो ,एक दिवस रंगदुम ला थांबून!
झंस्कार साठी असलेल्या टॅक्सी युनिअन च्या ऑफिसात जाऊन संध्याकाळीच आम्ही झायलो गाडी बुक करून आलेलो. प्रवासातलं पाहिलं रोमांचक ठिकाण उद्या असणार होतं . उद्याची वाट बघवत नव्हती. प्रवासाचा थकवा एवढा काही जाणवत नव्हता. संध्याकाळी काश्मिरी चहा कावा प्यायलो. मस्त लागली.
राजेशला बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत निद्रेच्या अधीन झालो.
-------------------------------------------------------****-------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment